ऑस्ट्रेलियाची विजयाची हॅट्ट्रीक (१९९९-२००७)

ऑस्ट्रेलियाची विजयाची हॅट्ट्रीक (१९९९-२००७)



१९९९ चा विश्वचषकासह ऑस्ट्रेलियन संघ 

२००३ च्या विश्वचषकासह ऑस्ट्रेलियन संघ 



२००७ च्या विश्वचषकासह ऑस्ट्रेलियन संघ 

          १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे आले. या स्पर्धेतील काही सामने स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि नेदरलँडमध्ये झाले. या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सुपर ६ सामन्यांचे लक्ष पूर्ण केल्यानंतर सेमी फायनलसाठी पात्र ठरले. सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला सामन्याच्या अखेरच्या षटकात नाटयपूर्णरित्या बाद केले. 
          दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेमी फायनलच्या अनिर्णित राहिलेल्या सामन्यामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोचले. दक्षिण आफ्रिकेचे लान्स क्लुसनर व डोनाल्ड हे फलंदाज खेळपट्टीवर होते. त्यांना विजयासाठी एक धाव आवश्यक होती. धाव घेताना डोनाल्डच्या हातून बॅट पडली. मिड पिचवर येऊन थांबला असताना डोनाल्डला रन आऊट केले. 
          अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १३२ धावात गारद केले आणि हे विजयाचे लक्ष आठ विकेट राखून व २० षटकांच्या आतच पूर्ण केले. 
          २००३ च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे व केनया यांच्याकडे आले. या स्पर्धेत चौदा संघांनी सहभाग घेतला. म्हणजेच १२ वरून १४ संघांपर्यंत संख्या वाढवण्यात आली. या स्पर्धेत केनियाने चांगली कामगिरी करताना झिम्बाब्वेवर विजय मिळवला. न्यूझीलंड संघाने सुरक्षिततेच्या काळजीने केनियामध्ये खेळण्यास नकार दिला. यामुळे न्यूझीलंड संघाला शिक्षा म्हणून हा सामना गमवावा लागला. न्यूझीलंडच्या या निर्णयामुळे असोसिएशनने एक चांगला निर्णय घेतला कि, केनियाला सेमी-फायनलमध्ये खेळण्यासाठी संधी दिली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावून ३५९ धावा केल्या. अंतिम सामन्यातील ह्या सर्वात जास्त धावा आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी पराभव करून लागोपाठ दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. 
          २००७ च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद वेस्ट इंडिजने भूषविले. या स्पर्धेत एकूण सोळा संघानी सहभाग घेतला. ग्रुप स्टेज मधील सामन्यातून खेळताना विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रथमच खेळणाऱ्या आयर्लंड संघाकडून पाकिस्तानचा निराशाजनक पराभव झाला. यावेळेला पाकिस्तानचे असलेले कोच बॉब वूल्मर यांचा मृतदेह त्यांचे हॉटेल रूममध्ये सापडला. जमैकन पोलिसांनी वूल्मर यांच्या मृत्यूची लगेच चौकशी चालू केली. पण नंतर त्यांचा मृत्यू हार्ट फेलने झाला आहे हे निश्चित झाले. अंतिम सामन्यात खराब प्रकाश स्थितीमुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा ५३ धावांनी पराभव केला आणि लागोपाठ तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली. 














Comments

Popular posts from this blog

क्रिकेट वर्ल्ड कप १९७५ - २०१५ एक रंजक प्रवास

'सर' रवींद्र जडेजा

भिन्न विश्वचषक विजेते ( १९८७-१९९६)