क्रिकेट वर्ल्ड कप १९७५ - २०१५ एक रंजक प्रवास

क्रिकेट वर्ल्ड कप १९७५ - २०१५ एक रंजक प्रवास 

                     एक दिवशीय क्रिकेट सामन्यामधील icc क्रिकेट वर्ल्ड कप हि आंतरराष्ट्रीय प्रभुत्व असलेली प्रतियोगिता आहे. दर चार वर्षांनी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे (icc चे) स्पोर्ट्स गव्हर्निंग बॉडीतील व्यक्ती क्रिकेट वर्ल्ड कपच्या कार्यक्रमाची रचना करीत असतात. तसेच प्राथमिक पात्रता फेरीपासून ते अंतिम सामान्यांपर्यंत नेतृत्व करीत असतात. विश्वचषक प्रतियोगिता हा  जगातील  एक नंबरचा खेळात रंगत आणणारा दृश्यात्मक देखावा आहे. विचारात घेण्यासारखी गोष्ट अशी कि हि icc कडून भरवली जाणारी प्रतियोगिता म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे निशाण फडकवत ठेवणारा दिमाखदार सोहळा आहे. 
               पहिल्या विश्वचषकाची सुरवात जून १९७५ मध्ये इंग्लंड मध्ये झाली. याआधी पहिला एक दिवसीय क्रिकेट सामना चार वर्ष आधी म्हणजेच १९७१ साली खेळला गेला. पुरुषांच्या विश्वचषक प्रतियोगितेनंतर दोन वर्षांनी महिलांची क्रिकेट विश्वचषक प्रतियोगिता खेळवली गेली. पहिल्या तीन विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या. १९८७ च्या स्पर्धेपासून क्रमानुसार (आळीपाळीने) प्रत्येक देशामध्ये विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद विभागून देण्यात आले. 
               विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम निवडीच्या वेळी आय सी सी  चे दहा सभासद संघ कि जे टेस्ट क्रिकेट खेळतात ते सहभागी होतात. जे आय सी सी शी संबंधित  व आय सी सी शी मैत्रीपूर्व संबंध व एकमत असणारे संघ "वर्ल्ड क्रिकेट लीग" व "क्वालीफायिंग टूर्नामेंट (पात्रताफेरी स्पर्धेतून)" या मार्गाने निवडले जातात. आतापर्यंत अकरा विश्वचषक स्पर्धांमधून एकूण २० संघानी सामने खेळले. शेवटच्या २०१५ च्या विश्वचषक प्रतियोगितामध्ये १४ संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. 
               आतापर्यंत झालेल्या विश्वचषक प्रतियोगितेपैकी ऑस्ट्रेलियाने ५ वेळा स्पर्धा जिंकली. वेस्ट इंडिज, भारत यांनी प्रत्येकी २ वेळा तर पाकिस्तान व श्रीलंका यांनी एकदा स्पर्धा जिंकली. २००३ सालच्या प्रतियोगितेमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये आय सी सी ची फुल मेंबर नसलेली टीम केनया सेमी फायनल पर्यंत पोचली. केनयाची हि विश्वचषक स्पर्धेमधील उत्कृष्ट कामगिरी म्हणून पहिली जाते. 
आय सी सी विश्वचषक ट्रॉफी 




                              प्रुडेन्शिअल विश्वचषक ट्रॉफी 





















एक 
        

Comments

Popular posts from this blog

ऑस्ट्रेलियाची विजयाची हॅट्ट्रीक (१९९९-२००७)

प्रुडेन्शिअल वर्ल्ड कप (१९७५-१९८३)