'सर' रवींद्र जडेजा




'सर' रवींद्र जडेजा 

          रवींद्र जडेजा हा डावखुरा फलंदाज व गोलंदाज आहे. तो मधल्या फळीत खेळणारा अष्टपैलू खेळाडू आहे. रवींद्र जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी सौराष्ट्रातील नवागाम-खेडमध्ये झाला. वडील (अनिरुद्ध) खासगी सुरक्षा संस्थेत वॉचमन होते. मुलाने लष्करात जावे, अशी त्यांची इच्छा होती; पण रवींद्र जडेजाला क्रिकेटचे आकर्षण होते. त्याच्या आईचे २००५ मध्ये अपघाती निधन झाले त्यामुळे त्याला धक्का बसला. या धक्क्यामुळे त्याचे क्रिकेटवरील लक्ष उडाले. परंतु त्याने स्वतःला सावरले व परत क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. यासाठी त्याला त्याच्या दोन बहिणींनी मदत केली व क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्याची डावखुरी फलंदाजी व गोलंदाजीमुळे तसेच चपळ क्षेत्ररक्षणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या अष्टपैलू खेळीने दिग्गज खेळाडूंवर त्याने आपली छाप पडली. 
कारकीर्द --
          रवींद्र जडेजा दोन युवा विश्वकरंडक स्पर्धात खेळला. त्याने २००६ मधील स्पर्धेत अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध तीन विकेट घेतल्या. परंतु भारताने हा सामना गमावला. तो २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विजेता ठरलेल्या संघाचा उपकर्णधार होता. त्या स्पर्धेत त्याने १० विकेटसह मोलाचे योगदान दिले. त्याने २००६-०७ च्या मोसमात रणजी पदार्पण केले. त्याने ८ फेब्रुवारी २००९ रोजी श्रीलंकेविरुद्ध कोलंबोत वन-डे मध्ये पदार्पण केले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये २०१२ मध्ये एका मोसमात तीन त्रिशतके काढली. अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला. या कामगिरीमुळे त्याच्यासाठी कसोटी क्रिकेटची दारे खुली झाली. या खेळीने त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध तो पहिली कसोटी खेळला. त्याने २०१३ मध्ये वन-डे गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. अनिल कुंबळेनंतर हि  कामगिरी केलेला तो दुसराच भारतीय ठरला. 
          आयपीएलमधील राजस्थानचा कर्णधार शेन वॉर्न याने दुर्दम्य आत्मविश्वासाबद्दल जडेजाला 'रॉकस्टार' हे टोपणनाव दिले. त्याच्या अष्टपैलू खेळीमुळे महेंद्रसिंह धोनीने त्याला "सर" हि पदवी दिली. विकेट मिळाल्यावर किंवा शतक, अर्धशतक झळकवल्यावर त्याची उत्स्फूर्त जल्लोषाची शैली लोकप्रिय ठरली. 













Comments

Popular posts from this blog

क्रिकेट वर्ल्ड कप १९७५ - २०१५ एक रंजक प्रवास

भिन्न विश्वचषक विजेते ( १९८७-१९९६)