भिन्न विश्वचषक विजेते ( १९८७-१९९६)

विश्वचषकासह ऑस्टेलियन कप्तान एलन बॉर्डर 

विश्वचषकासह ऑस्ट्रेलियन संघ 

 विश्वचषकासह श्रीलंकेचा कप्तान अर्जुन रणतुंगा 

विश्वचषकासह पाकिस्तानचा कप्तान इम्रान खान 

भिन्न विश्वचषक विजेते ( १९८७-१९९६)

            भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेचे एकत्रित यजमानपद स्वीकारले. पहिल्यांदाच हि स्पर्धा इंग्लंडबाहेर भरवली जात होती. इंग्लंडच्या तुलनेत भारतीय उपखंडात दिवसाच्या प्रकाशाचे तास कमी असल्याने खेळाच्या प्रत्येक डावातील षटकांची संख्या ६० वरून ५० पर्यंत कमी करण्यात आली. इंग्लंडला ७ धावांनी हरवून ऑस्ट्रेलियाने हि विश्वचषक स्पर्धा जिंकली. 
               १९९२ ची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात झाली. या स्पर्धेत बरेच बदल झाले जसे कि रंगीत कपडे, पांढरा चेंडू, दिवस-रात्रीचे सामने, क्षेत्ररक्षणातील नियमांच्या मर्यादेत बदल झाले. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने पहिल्यांदाच भाग घेतला. त्यांच्या देशातील वर्णद्वेषी शासन संपले त्यामुळे त्यांच्यावर टाकलेला आंतरराष्ट्रीय खेळातील बहिष्कार संपुष्टात आला. या स्पर्धेत पाकिस्तानची निराशाजनक सुरवात झाली. अखेरीस त्यांनी अंतिम सामन्यात इंग्लंडचा २२ धावांनी पराभव करून विश्वचषक विजेत्याच्या रूपात दिसले. 
               १९९६ ची विश्वचषक स्पर्धा भारतीय उपखंडात दुसऱ्यांदा झाली. यावेळेला श्रीलंकेला यजमान म्हणून समाविष्ट करून घेण्यात आले व त्यांच्या ग्रुपमधील सामने तिथेच खेळवले गेले. 
               सेमी-फायनल मध्ये ईडन-गार्डनवर झालेल्या सामन्यात भारताच्या विरुद्ध श्रीलंका एका निर्णायक विजयाच्या दिशेने चालले होते. श्रीलंकेच्या २५२ धावांचा पाठलाग करताना यजमान भारतीय संघाने १२० धावात आठ विकेट गमावल्या. या भारताच्या खराब कामगिरीवर प्रेक्षकांमध्ये अस्वस्थता वाटू लागली. त्यांनी निषेध नोंदवायला सुरवात केली. प्रेक्षकांच्या या चुकीमुळे श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आले. लाहोरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा सात विकेटने पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले.               






Comments

Popular posts from this blog

क्रिकेट वर्ल्ड कप १९७५ - २०१५ एक रंजक प्रवास

'सर' रवींद्र जडेजा