प्रुडेन्शिअल वर्ल्ड कप (१९७५-१९८३)
प्रुडेन्शिअल वर्ल्ड कप (१९७५-१९८३)
१९७५ मध्ये झालेल्या सुरवातीच्या क्रिकेट वर्ल्ड कपचे यजमानपद इंग्लंडने घेतले. ७ जूनला वर्ल्ड कप खेळाची सुरवात झाली. पहिले तीन क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये झाले. हे तिन्ही वर्ल्ड कप प्रुडेन्शिअल प्रा. लि. कंपनीने पुरस्कृत केल्याने या वर्ल्ड कप ला प्रुडेन्शिअल कप म्हणून ओळखले जाते. ह्या मॅचेस ६० ओव्हरच्या ( षटकांच्या) असायच्या . प्रत्येक संघाने या ६० ओव्हर्स टाकायच्या. हे सामने परंपरागत रचनेनुसार म्हणजेच सामने दिवसाच्या वेळेस खेळवले गेले तसेच प्रत्येक खेळाडूने क्रिकेटचा पंधरा वेष परिधान केला होता व लाल क्रिकेट चेंडू वापरला होता.
पहिल्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड,भारत,न्यूझीलंड ,पाकिस्तान आणि वेस्टइंडीज हे टेस्ट क्रिकेट खेळणारे ६ देश तसेच यांचेबरोबर श्रीलंका आणि ईस्ट आफ्रिका हे दोन संघ असे मिळून आठ संघांचा सहभाग होता. या विश्वचषक स्पर्धेमधील एक संस्मरणीय गोष्ट/घटना अशी कि वर्णद्वेषावरून दक्षिण आफ्रिकेला या विश्वचषक स्पर्धेतून वगळले. तसेच याआधी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यावर बंदी आणली. लॉर्ड्सवर झालेल्या अंतीम सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी हरवून हि स्पर्धा जिंकली.
वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कसोटी सामने न खेळणारे संघांची निवड होण्यासाठी आयसीसी ट्रॉफी स्पर्धेकडे पहिले जाते. १९७९ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हि स्पर्धा महत्वाची होती. श्रीलंका व कॅनडा हे संघ पात्र ठरले. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने यजमान इंग्लंडचा ९२ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकली.
दोन स्पर्धेनंतर आलेल्या १९८३ च्या तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेचेही यजमानपद इंग्लंडने स्वीकारले. या वेळेला श्रीलंका हा कसोटी क्रिकेट खेळणारा देश ठरला तर झिंबांब्वे हा देश icc ट्रॉफीद्वारे पात्र ठरला. या विश्वचषक स्पर्धेपासून स्टम्पपासून ३० यार्ड पर्यंत (२७ मीटर) फिल्डिंग सर्कलला (क्षेत्ररक्षणाचे वर्तुळ) सुरवात झाली. या सर्कलच्या आत चार क्षेत्ररक्षक ठेवणे जरुरीचे झाले. स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या आधी प्रत्येक संघ दुसऱ्या संघांशी दोनदा खेळत होते. अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करून विश्वचषकाचा मुकुट धारण केला.
प्रुडेन्शिअल वर्ल्ड कप
वर्ल्ड कप क्लाइव्ह लॉईड स्वीकारताना
वर्ल्ड कप कपिल देव स्विकारताना
Comments
Post a Comment