भिन्न विश्वचषक विजेते ( १९८७-१९९६)

विश्वचषकासह ऑस्टेलियन कप्तान एलन बॉर्डर विश्वचषकासह ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकासह श्रीलंकेचा कप्तान अर्जुन रणतुंगा विश्वचषकासह पाकिस्तानचा कप्तान इम्रान खान भिन्न विश्वचषक विजेते ( १९८७-१९९६) भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी १९८७ च्या विश्वचषक स्पर्धेचे एकत्रित यजमानपद स्वीकारले. पहिल्यांदाच हि स्पर्धा इंग्लंडबाहेर भरवली जात होती. इंग्लंडच्या तुलनेत भारतीय उपखंडात दिवसाच्या प्रकाशाचे तास कमी असल्याने खेळाच्या प्रत्येक डावातील षटकांची संख्या ६० वरून ५० पर्यंत कमी करण्यात आली. इंग्लंडला ७ धावांनी हरवून ऑस्ट्रेलियाने हि विश्वचषक स्पर्धा जिंकली. १९९२ ची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात झाली. या स्पर्धेत बरेच बदल झाले जसे कि रंगीत कपडे, पांढरा चेंडू, दिवस-रात्रीचे सामने, क्षेत्ररक्षणातील नियमांच्या मर्यादेत बदल झाले. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने पहिल्यांदाच भाग घेतला. त्यांच्या देशातील वर्णद्वेषी शासन स...