ऑस्ट्रेलियाची विजयाची हॅट्ट्रीक (१९९९-२००७)

ऑस्ट्रेलियाची विजयाची हॅट्ट्रीक (१९९९-२००७) १९९९ चा विश्वचषकासह ऑस्ट्रेलियन संघ २००३ च्या विश्वचषकासह ऑस्ट्रेलियन संघ २००७ च्या विश्वचषकासह ऑस्ट्रेलियन संघ १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे आले. या स्पर्धेतील काही सामने स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि नेदरलँडमध्ये झाले. या स्पर्धेत १२ संघांनी सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सुपर ६ सामन्यांचे लक्ष पूर्ण केल्यानंतर सेमी फायनलसाठी पात्र ठरले. सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला सामन्याच्या अखेरच्या षटकात नाटयपूर्णरित्या बाद केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेमी फायनलच्या अनिर्णित राहिलेल्या सामन्यामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोचले. दक्षिण आफ्रिकेचे लान्स क्लुसनर व डोनाल्ड हे फलंदाज खेळपट्टीवर होते. त्यांना विजयासाठी एक धाव आवश्यक होती. धाव घेताना डोनाल्डच्या हातून बॅट पडली. मिड पिचवर येऊन थांबला असताना डोनाल्डला रन आऊट केले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियान...